मुंबई - कोरोना लसीच्या वापराकरता सरकारकडून लवकरच परवानगी मिळण्याच्या शक्यता आहे. अशा स्थितीत लस वाहतुकीकरता स्पाईसजेटने ओम लॉजिस्टिक्सबरोबर केला आहे.
ओम लॉजिस्टिक्सच्या भागीदारीमागे वेगाने आणि अद्वितीय अशी कोरोना लसीची वाहतूक आणि डिलिव्हरी होणे हा उद्देश आहे. तसेच शीत साखळीचे देशात व आंतरराष्ट्रीयस्तरावर शाश्वत जाळे तयार करण्याचा उद्देश असल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे. नुकतेच गुरुग्राममधील स्पाईसएक्सप्रेस या विमान कंपनीने उणे ४० ते २५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत तापमानात राहणाऱ्या औषध व लसीची वाहतूक करणारी सेवा सुरू केली आहे.
हेही वाचा-सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात
अशी असणार भागीदारी-
- ओम लॉजिस्टिक्सचे जगभरात १,२०० कार्यालये आहेत.
- त्यामधून देशात पिनकोड असलेल्या १९ हजार ठिकाणी डिलिव्हरी देणे शक्य आहे.
- भागीदारीमुळे स्पाईसजेटची क्षमता वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- या भागीदारीतून ओम लॉजिस्टिक्स ही स्पाईसजेटल शीतकरणाची सुविधा असेलल्या ट्रक पुरविणार आहे.
- तर स्पाईसजेटकडून देशभरासह विदेशात कमी तापमानामध्ये लसीची हवाई वाहतूक करण्यासाठी सेवा देण्यात येणार आहे.
स्पाईजेटकडे देशात ५४ आणि जगभरात ४५ आंतरराष्ट्रीय ठिकाणी विमानांची सेवा पोहोचतात. तर कंपनीकडे १७ मालवाहू विमाने आहेत.
हेही वाचा-सोलापुरात चार टप्प्यात दिली जाणार कोरोनाची लस
सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीसाठी यंत्रणा सज्ज
सोलापूर जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली आहे. ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड रूग्ण असे चार टप्पे केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ३० हजार २८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.