बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- देशामध्ये दूरसंचारमधील स्पेक्ट्रमचा आज पहिला लिलाव झाला आहे. हे स्पेक्ट्रम पाच वर्षासाठी ७७,८१४.८० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. यामधील सर्वात मोठा हिस्सा अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओने घेतला आहे.
२,२५० मेगाहार्टझ स्पेक्ट्रम हे दूरंसचार संदेशासाठी सात बँडमध्ये वापरले जातात. या स्पेक्ट्रमची ४ लाख कोटी रुपये राखीव किमतीने सोमवारी विक्रीला सुरूवात झाली होती.
- दूरसंचार विभागाचे सचिव अंशू प्रकाश म्हणाले की, ८५५.६० मेगाहार्टझ स्पेक्ट्रम हे दोन दिवसांच्या लिलावामध्ये ७७,८१४.८० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. यामध्ये स्पेक्ट्रम हे रिलायन्स जिओने ५७,१२२.६५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
- भारती एअरटेलने ध्वनीतरंग हे १८,६९९ कोटी रुपये आणि व्होडाफोन आयडियाने ध्वनीतरंग हे १,९९३.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
- मात्र, ७०० आणि २,५०० मेगाहार्टझ बँडची खरेदी करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.
- रिलायन्सने स्पेक्ट्रमध्ये मोठा ठसा उमटविला आहे. स्पेक्ट्रममध्ये रिलायन्सने ५५ टक्क्यांनी हिस्सा वाढल्याचे कंपनीने ईटीव्ही भारतला सांगितले आहे.
हेही वाचा- स्टेट बँकेपाठोपाठ कोटक महिंद्रा बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात
ही आहेत महसूल कमी मिळण्याची कारणे
- स्पेक्ट्रम मिळविण्याचे ४ लाख कोटींचे उद्दिष्ट असताना महसूल कमी मिळाला आहे. ७०० मेगाहार्टसाठी दूरसंचार कंपन्यांनी तयारी दाखविली नाही. कारण, त्यांना दुसऱ्या मेगाहार्टझमध्ये पर्याय उपलब्ध होते.
- भारती एअरटेलने म्हटले की, मोठ्या प्रमाणात स्पेक्ट्रम उपलब्ध होते. असे असले तरी ७०० मेगाहार्टझला खरेदी करण्यासाठी कोणीही तयारी दाखविली नाही. कारण, त्यांची जास्त किंमत होती.
हेही वाचा-शेअर बाजाराने गाठला पुन्हा ५०,००० चा टप्पा; आयटीचे शेअर तेजीत!