चेन्नई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासगी अंतराळ कंपन्यांना इस्रोच्या सुविधा देण्याची घोषणा शनिवारी केली आहे. या निर्णयामुळे अंतराळ स्टार्टअपला अंतराळ क्षेत्रात भविष्यासाठी विविध प्रकल्प, अंतराळ प्रवास यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.
अंतराळ तंत्रज्ञानातील सुधारणांविषयी चेन्नई येथील स्पेस किड्स या स्टार्टअपच्या संस्थापक डॉ. श्रीमती केसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की आमच्या विद्यार्थ्याने संरचना केलेली क्युबसॅट 'कलामसॅट' हे नासाद्वारे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा-आर्थिक पॅकेज पाचवा टप्पा: सीतारामन आज सकाळी अकरा वाजता करणार घोषणा
नासाकडून खूप आधीपासून खासगी कंपन्यांना संधी देण्यात येत आहे. निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणांचे डॉ. श्रीमती केसन यांनी स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, की अनेक विद्यार्थी अंतराळ तंत्रज्ञान शिकण्यासाठी विदेशात जात असतात. अर्थमंत्र्यांच्या पॅकेजनंतर अनेक शैक्षणिक संस्था उपग्रह प्रक्षेपणासाठी पुढे येवू शकतात. अंतराळ विज्ञान हे आता पुस्तकापलीकडे आणि खूप नवसंशोधनाचे असणार आहे. यापूर्वी डॉ. श्रीमती यांच्या स्पेस टीमने इस्रोबरोबर काम केले आहे.
हेही वाचा-आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी
खासगी कंपन्या अंतराळ तंत्रज्ञानात आल्या तर त्याचा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत होवू शकते. अंतराळ तंत्रज्ञानाने मोठी आपत्ती येण्याची आधी सूचना देण्यात येते. सध्या, त्यासाठी केवळ इस्रोवर पूर्ण भार आहे.