ETV Bharat / business

' पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास आराखडा सरकारने मागे घ्यावा'

author img

By

Published : Aug 13, 2020, 4:13 PM IST

सरकारवर पर्यावरणाचे संरक्षण करण्याची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने ईआयएचा आराखडा मागे घ्यायला पाहिजे, अशी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना लेखातून मागणी केली आहे.

संग्रहित-डावीकडे सोनिया गांधी, उजवीकडे राहुल गांधी

नवी दिल्ली – सरकार हे भारतीय पर्यावरणाच्या नियमनाचे तुकडे करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केला आहे. सरकारने पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास (ईआयए) आराखडा त्वरित मागे घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने पर्यावरण प्रभाव मूल्यांकन 2020 च्या आराखडाविषयक अधिसूचना काढली आहे. यामध्ये विविध प्रकल्पांना पर्यावण मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या ना हरकत परवान्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. त्यावर हजारो लोकांनी सूचना पाठविल्या आहेत. सरकारवर पर्यावरणाचे संरक्षण करण्याची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने ईआयएचा आराखडा मागे घ्यायला पाहिजे, अशी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना लेखातून मागणी केली आहे.

त्यांनी लेखात म्हटले, की थोडक्यात सांगायचे झाले तर, सरकारने भारतीय पर्यावरणाच्या नियमनांचे तुकडे करणे थांबवावे. त्यासाठी महत्त्वाचे पहिले पाऊल म्हणजे ईआयए 2020 आराखड्याची अधिसूचना मागे घेणे आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, की अर्थातच विकास व्हायला हवा. मात्र, तिथे मर्यादा असणे आवश्यक आहे. तिथे अतिक्रमण होवू शकत नाही. गेल्या सहा वर्षात सरकारने पर्यावरणाचे संरक्षण करणारा आकृतीबंध संपविल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पर्यावरण आराखड्यावर आक्षेप घेणारा लेख ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, की निसर्गाचे संरक्षण केले तर निसर्गाकडून संरक्षण होते. सरकारने भारतीय पर्यावरणाच्या नियमनाचे तुकडे करणे थांबवावे.

दरम्यान, ईआयएबाबतची अधिसूचना ही अंतिम नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.