नवी दिल्ली - टाळेबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे लक्ष वेधले. त्यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून वित्तीय संकटात असलेल्या एमएमएमईच्या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
सोनिया गांधींना पंतप्रधान मोदींना पत्रात म्हटले, की एमएसएमई क्षेत्राचा देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनात (एमएसएमई) एक तृतीयांश हिस्सा आहे. तर देशाच्या एकूण निर्यातीत ५० टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रातून ११ कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.
हेही वाचा-टाळेबंदीत केशकर्तनालय व दारूची दुकाने बंदच राहणार; 'हे' आहे कारण
सध्याच्या घडीला ६.३ कोटी एमएसएमई उद्योग आर्थिक संकटात आहेत. टाळेबंदीच्या एका दिवसात एमएसएमईचे रोज ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. सर्व उद्योग महामंदी अनुभवत आहेत. त्यामुळे ११ कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. एमएसएमई उद्योगांना कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते देण्यात अडचणी येत आहेत.
हे उपाय सोनिया गांधींनी सूचविले
- एमएसएमई वेतन संरक्षणासाठी १ लाख कोटींचे पॅकेज देण्यात यावे.
- एमएसएमईसाठी उद्योगांना १ लाख कोटी रुपयांची हमी द्यावी.
- एमएसएमईउद्योगांना पुरेसा वित्तपुरवठा मिळण्याची खात्री द्यावी. त्यासाठी २४X७ हेल्पलाईन सुरू करावी.
- एमएसएमई उद्योगांची कर्ज वसूली तीन महिने थांबवावी.
- एमएसएमई उद्योगाचे कर माफ करावेत.
हेही वाचा-टाळेबंदीत अक्षय तृतीया: ऑनलाईन विक्रीतूनच सराफ साधणार 'मुहूर्त'