नवी दिल्ली - इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत ओलाने विक्रम रचला आहे. एका दिवसात 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ओला इलेक्ट्रिकच्या वाहनांची विक्री झाली आहे. ही माहिती ओला इलेक्ट्रिकचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.
ओला इलेक्ट्रिकची गुरुवारी मध्यरात्रीपासून विक्री बंद होणार असल्याचे भाविश अग्रवाल यांनी सांगितले. ओला इलेक्ट्रिकने ओला एस1 आणि एस2 या दोन मॉडेलची विक्री बुधवारी जाहीर केली होती.
हेही वाचा-बिहारमध्ये दोन मुले अचानक झाले अब्जाधीश; बँक खात्यात 960 कोटींहून अधिक रक्कम जमा
काय म्हणाले भाविश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये?
भाविश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भारत हे इलेक्ट्रिक वाहनांना स्वीकारत आहेत. तर पेट्रोलच्या वाहनांना नाकारत आहे. दर सेकंदात 4 स्कूटरची विक्री झाली आहे. आज शेवटचा दिवस आहे. मध्यरात्रीपासून खरेदी बंद होणार आहे. अग्रवाल यांनी ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले, की ग्राहकांनी ओला स्कूटरला अभूतपूर्व संख्येत प्रतिसाद दिला आहे. कोणतीही चूक केली नाही. इलेक्ट्रिक वाहनांचा हा काळ आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी असल्याचेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-राहुल गांधी हे इच्छाधारी हिंदू- मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांची खरमरीत टीका
अशी आहे ओलाची इलेक्ट्रिक चार्जिंग-
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग हे घरातील 5ए सॉकेटच्या मदतीने करता येते. कंपनीने दुचाकीकरिता चार्जिंग नेटवर्कसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीकडून देशभरातील 400 शहरांमध्ये ग्राहकांकरिता 1 लाख चार्जिंग पाँईट्स सुरू करण्यात येणार आहेत. ओलाची ई-स्कूटर ही 18 मिनिटात 50 टक्के रिचार्ज होते. तर 75 किलोमीटर स्कूटर धावू शकते.