मुंबई: जागतिक बाजारातील नकारात्मक कल आणि सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव यामुळे बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात 400 अंकांनी घसरला. 30 शेअर्सचा निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात 434.59 अंक किंवा 0.71 टक्क्यांनी घसरून 60,800.71 वर आला.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा ( National Stock Exchange ) निफ्टी 111.10 अंकांनी किंवा 0.61 टक्क्यांनी घसरून 18,146.70 वर व्यवहार करत होता.सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी 2.49 टक्क्यांची घसरण एचसीएल टेकमध्ये झाली. याशिवाय एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, विप्रो, एचयूएल आणि टेक महिंद्राही तोट्यात होते. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, टायटन आणि बजाज फायनान्सचे शेयर फायद्यात ( Bajaj Finance shares gain )राहिले.
मागील सत्रात सेन्सेक्स 85.26 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 61,235.30 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45.45 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 18,257.80 वर बंद झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी भांडवली बाजारात निव्वळ विक्री केली आणि 1,390.85 कोटी रुपयांच्या शेयरची विक्री केली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ( International oil benchmark Brent crude ) 0.15 टक्क्यांनी घसरून 84.34 डॉलर प्रति बॅरल होता.
हेही वाचा : Silver ETF : सोन्यानंतर आता तुम्ही सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता