मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २५० अंशाने वधारला. अमेरिका-चीनमधील व्यापार करार होण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या सकारात्मक संकेतामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २८४ अंशाने वधारला. त्यानंतर शेअर बाजार २४४.०४ अंशाने वधारून ४०,८२५.७५ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ६६.२० अंशाने वधारून १२,०३८ वर पोहोचला.
हेही वाचा-म्हणून 'नेस्ले'ला केंद्र सरकारने ठोठावला ९० कोटींचा दंड
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
टाटा मोटर्सचे सर्वाधिक ३.७८ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ वेदांत, येस बँक, टाटा स्टील, एसबीआय, एम अँड एम, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले. भारती एअरटेलचे सर्वाधिक ०.५९ टक्क्यांनी शेअर घसरले. एशियन पेंट्स, कोटक बँक, बजाज ऑटो आणि सन फार्माचे शेअर घसरले. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार १६९.१४ अंशाने घसरून ४०,५८१.७१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ६१.२० अंशाने वधारून ११,९७१.८० वर पोहोचला.
हेही वाचा-केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या स्वीकारल्या २०० शिफारसी
अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांचे आजवर नुकसान झालेले आहे. या दोन्ही महासत्तामधील व्यापारी कराराची पहिल्या टप्प्यातील बोलणी पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी करार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार भांडवली बाजारातील गुंतवणूकीसाठी आशावादी झाले आहेत.