मुंबई - शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ६६३ अंशाने उसळी घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ३२
सुधारणांची घोषणी केली होती. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.
अमेरिका व चीनमध्ये व्यापारी युद्ध असल्याने शेअर बाजारातील तेजीला काहीशी मर्यादा आली. शेअर बाजार सकाळच्या सत्रात खुला होताना ३७,३६३.९५ वर पोहोचला. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ३६,७०१.१६ वर होता.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा अधिभार कर लागू करण्याचा निर्णय मागे घेणे यासारख्या घोषणा शुक्रवारी जाहीर केल्या होत्या.