मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३५० अंशांनी घसरला आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि अर्थव्यवस्थेवर होणारा वाईट परिणाम या कारणांनी गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
मुंबई शेअर बाजार ३५८.६१ अंशांनी घसरून ३०,०२१.२० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ८४.५० अंशांनी घसरून ८,८४०.८० वर पोहोचला. इन्फोसिसचे शेअर सर्वाधिक ४ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. त्यापाठोपाठ कोटक बँक, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, टायटन आणि अॅक्सिस बँकेचे शेअर घसरले आहेत. तर एल अँड टी, पॉवरग्रीड, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.
हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये प्रवासी रेल्वे बंद असूनही सरकारने असे कमविले ७.५ कोटी
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ३१०.२१ अंशांनी घसरून ३०,३७९.८१ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ६८.५५ अंशांनी घसरून ८,९२५.३० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआयएस) सुमारे १,३५८.६६ कोटी रुपयांच्या शेअरची मागील सत्रात खरेदी केली होती.