मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ११९.१५ अशांने वधारला आहे. शेअर बाजार ४०, ०२७ अंशावर पोहोचला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजी दिसून येत आहे.
दुसऱ्यांदा सत्तेत आलेले एनडी सरकार पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्र सरकार आर्थिक सुधारणा सुरुच ठेवेल, ही बाजारातील गुंतवणुकदारांना अपेक्षा आहे.