नवी दिल्ली - सेबीने बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची कंपी विवान इंडस्ट्रीजवर 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या प्रकरणात हा दंड ठोठावला आहे.
सेबीच्या आदेशानुसार राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी या दोघांना एकत्रित 3 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा हे दोघेही विवान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत. विवान इंडस्ट्रीजने ऑक्टोबर 2015 मध्ये प्रिफ्रेन्शियल अलॉटमेंटद्वारे 5 लाखांचे शेअर चार जणांना दिले. त्यामधून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना 2.57 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याबाबत वेळेवर माहिती दोघांनी जाहीर केली नाही. विवान इंडस्ट्रीजचे पूर्वी हिंदुस्थान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज असे नाव होते.
हेही वाचा-कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमोरील आव्हाने व राजकीय पार्श्वभूमी
दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणीत भर पडत आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आता त्याच्या सहकाऱ्यांच्याही मुस्क्या आवळण्याच्या तयारीत मुंबई पोलीस आहेत. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या 3 निर्मात्यांसह अभिनेत्री गहना वशिष्ठच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.
हेही वाचा-शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण; सचिन तेंडुलकरने केली मदत
राज कुंद्राच्या कोठडीत वाढ -
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. काल (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय -
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.