नवी दिल्ली - अनेकदा ग्राहकांचे कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढण्याचे गैरप्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नवा बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना मोबाईलवरील ओटीपी द्यावा लागणार आहे.
एसबीआयच्या एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक पैसे काढताना ग्राहकांना ओटीपी देणे बंधनकारक असणार आहे. हा ओटीपी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पैसे काढतानाच द्यावा लागणार आहे. हा बदल १ जानेवारी २०२० पासून होणार आहे. त्यामुळे एटीएममधून बेकायदेशीररित्या पैसे काढण्याचे प्रकार टळू शकणार आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना दिलासा मिळणार; अनुराग ठाकूर यांचे संकेत
स्टेट बँकेचे कार्ड असलेल्या ग्राहकांना इतर एटीएमवर ओटीपी द्यावा लागणार नाही. कारण त्यासाठी लागणारी नॅशनल फायनान्शियल स्विच (एनएफएस) सुविधा विकसित झालेली नाही. देशात स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक एटीएम आहेत.
हेही वाचा-डिझेल प्रति लिटर १७ ते १८ पैशाने महाग; पेट्रोल दर स्थिर