रियाध - येमेनच्या बंडखोरांनी दोन अॅरेमॅको तेल प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन तात्पुरते थांबविले आहे. त्यामुळे देशाच्या एकूण तेल उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाल्याचे उर्जा मंत्र्यांनी सांगितले.
अब्क्वेक आणि खुरैस प्रकल्पामधील उत्पादन प्रकल्पावर हल्ला झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्पादन तात्पुरते थांबवावे लागल्याचे उर्जा मंत्री राजकुमार अब्दुलअजीझ बिन सलमान यांनी सांगितले.
अॅरॅम्को ही सौदी सरकारची तेल कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ अमीन नसीर यांनी काम पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया अद्ययावत होईल, असे त्यांनी सांगितले. दोन्ही तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा-एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत गोंधळ!
इराणशी संबंधित असलेल्या हुथी बंडखोरांनी १० ड्रोनने हल्ला केल्याचे सौदीमधील माध्यमाने म्हटले आहे. या हल्ल्याला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी इराणला दोषी ठरले आहे. जगाला उर्जा पुरवठा करणाऱ्या ठिकाणी इराणने कधी नव्हे असा हल्ला केल्याची टीका पोम्पेओ यांनी केली.
हेही वाचा-'कोळसा खाण कामगारांचा संप रोखण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक ठरणार'
सौदी अरेबियाकडून भारतात दरवर्षी ३६.८ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. अमेरिकेने निर्बंध घातल्याने भारताने इराणकडून कच्चे तेल आयात करण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे भारताची कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी सौदी अरेबियावर अधिक भिस्त आहे.
हेही वाचा-लडाखमध्ये मोठा सौर प्रकल्प होणार सुरू; भाजप आमदाराने 'या' घातल्या अटी