हैदराबाद – चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याच्या भावनेचा सर्वाधिक फायदा चिनी स्मार्टफोन कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या सॅमसंगला होणार आहे. स्मार्टफोन उद्योगात चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. फार कमी कंपन्या चिनी स्मार्टफोनशी स्पर्धा करू शकतात, असे बाजार संशोधन करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.
बाजार संशोधन संस्था काउंटरपार्टचे वरिष्ठ विश्लेषक प्राचिर सिंह म्हणाले, की प्रत्येक किमतीच्या श्रेणीत चिनी कंपन्यांचेच वर्चस्व असल्याने ग्राहकांपुढेही फारसा पर्याय नाही. उदाहराणार्थ शाओमी आणि रिअलमी ही मध्यम खर्चातील श्रेणीत चिनी मोबाईल ग्राहकांना उपलब्ध आहेत. स्मार्टफोनच्या खरेदीत किमतीचा विषय हा संवेदनशील आहे. त्यामुळे लोक किमतीप्रमाणे दर्जेदार स्मार्टफोन खरेदीला प्राधान्य देतात, असे प्राचिर सिंह यांनी सांगितले. जागतिकीकरणामध्य ग्राहकांना उत्पादन कोठून आले, याचे फारसे महत्त्व नसते. दुसरी बाजू पाहिली तर अनेक स्मार्टफोनचे सुट्टे भाग हे जगाच्या विविध भागामधून आलेले असतात. चिनी उत्पादनांवर ग्राहकांना राग आहे, यावर विचारले असता बाजार संशोधक म्हणाले, की भारतात 99 टक्के विकणारे स्मार्टफोन हे देशातच असेंम्बल केले जातात. या कंपन्यांना भारतात मोठा रोजगार पुरवित आहेत. देशाच्या जीडीपी आणि अर्थव्यवस्थेत योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत मोबाईल उत्पादनांचे हब
भारत मोबाईल उत्पादक हब एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष अजेय मेहता यांनी होरॅसिस इंडियाच्या बैठकीत स्मार्टफोनच्या व्यवसायाविषयी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की कमी दरडोई उत्पन्न आणि कुशल मनुष्यबळ आपल्याकडे आहे. तसेच आपल्याकडे विविध भौगोलिक भागात तरुण ग्राहक आहेत. त्यामुळे कंपन्यांना भारतात येवून उद्योग स्थापण्याचे मोठे आकर्षण आहे. येत्या काळात 5 जीने येणाऱ्या तंत्रज्ञानाने स्मार्टफोनची बाजारपेठ आणखी विस्तारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात उत्पादकांना वीजेचा खर्च आणि कर अधिक असल्याची आयसीईए-ईवायच्या अहवालात म्हटले होते. तर त्यामानाने व्हिएतमान आणि चीनमध्ये 10 ते 20 टक्के खर्च कमी असल्याचे अहवालात नमूद केले होते. दीर्घकाळासाठी भारताला मोबाईल उत्पादनांचे हब होण्यासाठी काही कमतरता कराव्या लागणार असल्याचे अहवालात म्हटले होते.