मुंबई - शेअर बाजारात सकाळच्या सत्रात रुपया कमकुवत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत ९८ पैशांची घसरण होवून रुपया ७०.५८ वर पोहोचला आहे.
अमेरिका-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची घसरण झाल्याचे फॉरेक्स ट्रेडरने सांगितले. नुकतेच, अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनच्या मध्यवर्ती बँकेने चीनच्या चलनाचे अवमुल्यन (डेप्रिशिअन) करण्याची परवानगी दिली आहे.
रुपया डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी ६९.६० वर स्थिरावला होता. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १.२३ टक्क्यांनी घसरण होवून ६१.१३ डॉलरवर पोहोचले. जागतिक आर्थिक मंचावर चीनच्या युवानची (चीनचे चलन) ऑगस्ट २०१० पासून सर्वात अधिक घसरण झाली.