मुंबई - भारतीय चलनाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. रुपयाची सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत २६ पैशांनी घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ७१.८० रुपये झाले आहे. खनिज तेलाच्या वाढत्या दरामुळे रुपयाचे मूल्य घसरले आहे.
कोरोना विषाणुची भीती कायम असल्याने जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामधून निधी काढून घेण्यात सातत्य राहिले आहे. कोरोनामुळे चीनमधील मृतांचा आकडा २,११८ वर पोहोचला आहे.
रुपया डॉलरच्या तुलनेत मंगळवारी ७१.५४ वर पोहोचला होता. छत्रपती शिवाजी महाराचांची जयंतीनिमित्त फोरेक्स बाजार बुधवारी बंद होता.
हेही वाचा-केंद्र सरकारकडून दुग्धोत्पादन क्षेत्राकरिता ४,५५८ कोटी रुपयांची योजना मंजूर
खनिज तेलाच्या बॅरलची किंमत फ्युच्युअर्समध्ये ०.१० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ५९.१८ डॉलर झाली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून १९०.६६ कोटी रुपये काढून घेतले आहेत.