ETV Bharat / business

धक्कादायक! बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या 27 फरार आर्थिक गुन्हेगारांपैकी फक्त दोघांवर कारवाई - vinay Mittal

माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाला फरार आर्थिक गुन्हेगाराची माहिती विचारली. त्यावर मंत्रालयाने भारतात केवळ विनय मित्तल व सनी कारला देशात परत आणल्याचे घाडगे यांना माहिती अधिकारात उत्तर  दिले आहे.

मेहुल चोक्सी
मेहुल चोक्सी
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:42 PM IST

Updated : Nov 26, 2020, 4:20 PM IST

मुंबई- भारतातील वेगवेगळ्या बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून देशातील २७ उद्योगपती विदेशात पळून गेले आहेत. त्यांना आर्थिक फरार म्हणून घोषित करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे केवळ 2 आर्थिक गुन्हेगारांना भारतात कायदेशीर कारवाई करून परत आणण्यात आले आहे.

विदेशात पळून गेलेल्या आर्थिक फरार गुन्हेगारांच्या संदर्भात देशाचे राज्य अर्थमंत्री एस. पी. शुक्ला यांनी 4 जानेवारी 2019 रोजी लोकसभेमध्ये माहिती दिली होती. या माहितीनुसार 27 फरार आर्थिक गुन्हेगार हे देशाबाहेर पळून गेलेले आहेत.

27 फरार आर्थिक गुन्हेगारांपैकी फक्त दोघांवर कारवाई

देशातील 27 फरार आर्थिक गुन्हेगार
देशातील वेगवेगळ्या खासगी व सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून 27 गुन्हेगार विदेशात पळून गेले आहेत. 1) पुष्पेश भेद 2) आशिष जॉबनपुत्रा 3) विजय मल्ल्या 4) सनी कालरा 5) संजय कालरा 6) एसके कालरा 7) आरती कालरा 8) वर्षा कालरा 9) जतीन मेहता 10) उमेश पारेख 11) कमलेश पारेख 12) निलेश पारेख 13) एकलव्य गर्ग 14)विनय मित्तल 15)निरव मोदी 16)निशाल मोदी 17) मेहुल चोकसी 18) सब्या सेठ 19) राजीव गोयल 20) अलका गोयल 21)ल लित मोदी 22) नितीन जयंतीलाल संडेसारा 23) दिप्ती बेन चेतनकुमार संदे सारा 24) रितेश जैन 25) हितेश पटेल 26) मयुरी बेन पटेल 27) प्रीती आशिष जोबनपुत्रा

देशातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या आर्थिक फरार गुन्हेगारांचा नक्की आकडा समोर आला नाही. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाला फरार आर्थिक गुन्हेगाराची माहिती विचारली. त्यावर मंत्रालयाने भारतात केवळ विनय मित्तल व सनी कारला देशात परत आणल्याचे घाडगे यांना माहिती अधिकारात उत्तर दिले आहे.

हेही वाचा-बँक कर्मचारी संघटनांचा गुरुवारी संप; कामकाज विस्कळित होण्याची शक्यता

केवळ 2 आर्थिक गुन्हेगारांना पुन्हा भारतात परत-

विदेशातून भारतात परत आणण्यात आलेल्या विनय मित्तल याने देशातल्या सात बँकांना जवळपास 40 कोटी रुपयांचा चुना लावलेला होता. हा आर्थिक घोटाळा केल्यानंतर मित्तल 2018 मध्ये इंडोनेशिया या देशात पळून गेलेला होता. तर दुसरीकडे सनी कारला याने पंजाब नॅशनल बँकेला दहा कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेला होता. त्याला सीबीआयने मार्च 2020 मध्ये अटक करून पुन्हा भारतात आणले आहे.

हेही वाचा-'देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा अपेक्षेहून अधिक'

व्हाईट कॉलर गुन्हेगारांकडून अनधिकृत कर्ज लाटण्याचे प्रकार-
आयटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्या माहितीनुसार भारतात 'व्हाईट कॉलर' गुन्हेगार भारतात उद्योग करण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा कर्ज बँकांकडून घेण्यासाठी बँकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृतपणे कर्ज लाटत आहेत. घोटाळा समोर उघडकीला येण्यापूर्वी देश सोडून इतर देशांमध्ये पळून जाणे, हे आता नित्याचे झाल्याचे जितेंद्र घाडगे यांनी सांगितले. केवळ छोट्या आर्थिक गुन्हेगारांवर कारवाई केल्यानंतर मोठ्या आर्थिक गुन्हेगारांच्या संदर्भातसुद्धा अशीच कारवाई व्हावी, असे घाटगे यांनी म्हटले आहे.

नीरव मोदीही आर्थिक फरार म्हणून घोषित-

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला मुंबईतील विशेष न्यायालयाने डिसेंबर 2019 मध्ये फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. मोदीचा मामा मेहूल चोक्सी व विजय मल्ल्या यांनाही आर्थिक फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्यांना देशात परत आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरू आहे.

Last Updated : Nov 26, 2020, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.