मुंबई - आरटीजीएसवरून (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) पैसे पाठविण्याची सुविधा ही रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार आहे. ही माहिती आरबीआयने दिली आहे.
आरबीआयने आरटीजीएसच्या सुविधेबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे. आरबीआयकडून आरटीजीएसची तांत्रिक यंत्रणा अद्ययावत करण्यात येत आहे. त्यामुळे १७ एप्रिल २०२१ ला आरटीजीएसची सेवा रात्री १२ ते रविवारी दुपारी २ पर्यंत बंद राहणार आहे. असे असले तरी एनईएफटीची सेवा पैसे पाठविण्यासाठी सुरुच राहणार असल्याचे आरबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्यावर्षी १४ डिसेंबरपासून आरबीआयने आरटीजीएसची सुविधा २४x७ केली आहे.
हेही वाचा-रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला मिळणार ऑक्सिजन
काय आहे आरटीजीएस?
आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) या प्रणालीतून मोठी रक्कम काही क्षणातच पाठविली जाते. तर नॅशनल ईलेक्ट्रॉनिक फंडमधून (एनईएफटी) केवळ २ लाख रुपयापर्यंत रक्कम पाठविता येते.
हेही वाचा-पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे स्मशानभूमी यंत्रणांवर ताण