ETV Bharat / business

रिलायन्सचे 'गुजरात प्रेम', जिओसह पाच उपकंपन्यांची मुंबई सोडून अहमदाबादमध्ये केली नोंदणी - Ambani business

गुजरातमध्ये काही तरी नोंदणी करण्याची गरज वाटली, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे रिलायन्सने  म्हटले आहे. देशभरात एकच कर असल्याने रिलायन्स कंपनीवर काहीच फरक पडला नाही.  मात्र केवळ लेटरहेडमध्ये फरक पडल्याचे कंपनीने म्हटले आहे.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी
author img

By

Published : May 14, 2019, 2:29 PM IST

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विविध उपकंपन्यांची (subsidiaries) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नोंदणी आहे. मात्र गतवर्षी रिलायन्सने जिओसह पाच उपकंपन्यांची मुंबईतील नोंदणी रद्द करून ती गुजरातमध्ये केली आहे.

गुजरातमध्ये काही तरी नोंदणी करण्याची गरज वाटली, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. देशभरात एकच कर प्रणाली असल्याने रिलायन्स कंपनीवर काहीच फरक पडला नाही. मात्र केवळ लेटरहेडमध्ये फरक पडल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या कंपन्यांची गुजरातमध्ये करण्यात आली नोंदणी -
रिलायन्स जिओ इन्फोकॉम, रिलायन्स जिओ इन्फ्राटेल, रिलायन्स जिओ मेसेजिंग सर्व्हिसिंग, रिलायन्स जिओ डिजीटल सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीअरल इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग्ज या कंपन्यांची गुजरातमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आहेत.

अनेक कंपन्यांची नोंदणीसाठी मुंबईला पसंती -
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला सर्वाधिक कर मिळवून देणारे शहर आहे. जरी देशभर व्यवसाय असला तरी अनेक कंपन्या मुंबईत त्यांच्या कार्यालयांची नोंदणी करतात.

रिलायन्स कुटुंब हे मुळचे गुजरातमधील आहे. त्यांचे सर्वात मोठे पेट्रोकेमिकल उत्पादन केंद्रही गुजरातमधील जामनगरमध्ये आहे. गेल्या काही तिमाहीदरम्यान जिओचा नफा वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स जिओमध्ये सुमारे १ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र या कंपनीने किती कर भरला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.