ETV Bharat / business

दिलासादायक! रेल्वे तिकिटाचे आरक्षण सर्वांसाठी ऑनलाईनसह ऑफलाईन खुले - railway reservation by IRCTC

रेल्वे प्रवाशांना २२ मे रोजीपासून रेल्वे तिकीट आरक्षण आणि रद्द करण्याची सुविधा विविध पोर्टलमधून उपलब्ध होणार आहे. यामध्ये पोस्ट कार्यालय आणि यात्री तिकिट सुविधा केंद्रचा परवाना असलेल्या आरक्षण केंद्राचा समावेश आहे.

संग्रहित - रेल्वे
संग्रहित - रेल्वे
author img

By

Published : May 22, 2020, 5:58 PM IST

नवी दिल्ली - देशभरात टाळेबंदीमुळे विविध शहरांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील २३० रेल्वेचे आरक्षण सर्व श्रेणीतील डब्यांसाठी खुले करण्यात आले आहे. हे आरक्षण ऑनलाईन तसेच रेल्वे स्थानकावरील खिडकीतून उपलब्ध करण्यात आले आहे.

देशभरात प्रवाशांनी कालपासून १३ लाख तिकिटे ऑनलाईन बुक केल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. रेल्वे प्रवाशांना २२ मे रोजीपासून रेल्वे तिकीट आरक्षण आणि रद्द करण्याची सुविधा विविध पोर्टलमधून उपलब्ध होणार आहे. यामध्ये पोस्ट कार्यालय आणि यात्री तिकिट सुविधा केंद्रचा परवाना असलेल्या आरक्षण केंद्राचा समावेश आहे.

हेही वाचा-मुंबईत आजपासून रेल्वेच्या निवडक स्थानकांवर तिकीट काऊंटर होणार सुरू

आयआरसीटीसीने मान्यता दिलेले एजंट, संगणकीकृत प्रवासी आरक्षण व्यवस्था, सामाईक सेवा केंद्र (सीएसी) येथूनही प्रवाशांना आरक्षित तिकिटे घेता येणार आहेत. ही माहिती रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपाई यांनी दिली आहे.

हेही वाचा-राज्यांतर्गत प्रवासी रेल्वे सेवा बंदच राहणार! केवळ राज्याबाहेर जाण्यास परवानगी..

दरम्यान, टाळेबंदीच्या दोन महिन्यानंतर देशात येत्या 1 जूनपासून 200 एक्स्प्रेस रेल्वे धावणार आहेत. या रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग गुरुवारी 21 मे पासून सकाळी 10 वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरू झाली आहे. राज्यात रेल्वे प्रवासाला बंदी असल्यामुळे एक जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये राज्यांतर्गत तिकिटांचे आरक्षण करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी राज्यामधील शहरांची तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांचे आरक्षण रद्द करण्यात येणार आहे.

हेही वाचा-मध्य रेल्वेच्या 'या' विशेष गाड्या 1 जूनपासून दररोज धावणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.