ETV Bharat / business

'रिलायन्सला इन्फा'ला वर्सोवा-वांद्राच्या सी लिंक प्रकल्पाचे ७ हजार कोटींचे कंत्राट - Maharashtra State Road Development Corporation

विशेष म्हणजे इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने नुकतेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मानांकन कमी केले आहे. हे मानांकन डी (कंपनी सहकार्य करत नाही) म्हणजे अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या लेखापरीक्षकांनी वित्तीय परिणामाबाबत इशारा दिला होता.

संग्रहित
author img

By

Published : Jun 26, 2019, 6:07 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला वर्सोवा-वांद्राच्या सी लिंक प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. हे कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले आहे. या कंत्राटाची किंमत ७ हजार कोटी रुपये आहे.

वर्सोवा - वांद्रा प्रकल्प हा १७.१७ किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प रिलायन्सला २४ जूनला २०१९ ला मिळाला आहे. या दिवसांपासून ६० महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कंपनी सज्ज झाली आहे. यापूर्वी बांधण्यात आलेल्या वांद्रा-वरळी सी लिंकची लांबी ५.६ किलोमीटर एवढी आहे. वर्सोवा-वांद्रा सी लिंकमुळे प्रवास करताना मुंबईकराच्या ८० मिनिटांची बचत होणार आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मानांकन घसरले-
विशेष म्हणजे इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने नुकतेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मानांकन कमी केले आहे. हे मानांकन डी (कंपनी सहकार्य करत नाही) म्हणजे अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या लेखापरीक्षकांनी वित्तीय परिणामाबाबत इशारा दिला होता. तसेच विविध चिंतेचे विषय असताना ग्रुपच्या क्षमतेवर संशय व्यक्त केला होता.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला ३१ मार्चच्या तिमाहीपर्यंत ३ हजार ३०१ कोटींचे नुकसान झाले होते. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीला १३३.६६ कोटींचा नफा झाला होता. कंपनीला २०१८-२०१९ मध्ये २ हजार ४२६.८२ कोटींचा तोटा झाला होता. तर २०१७-१८ मध्ये १ हजार २५५.५० कोटींचा नफा झाला होता. शेअर बाजारात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर हे १०.२१ टक्क्यांनी वधारले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.