ETV Bharat / business

रिलायन्स गुजरातमध्ये सुरू करणार १ हजार ऑक्सिजन बेडचे रुग्णालय

रुग्णालयात लागणारी इतर साधने आणि उपकरणेही रिलायन्स इंडस्ट्रीजकडून बसविण्यात येणार आहेत. हे कोव्हिड रुग्णालय जामनगर आणि सौराष्ट्रातील जिल्ह्यांतील रुग्णांसाठी कार्यरत राहणार आहे.

Mukesh Ambani
मुकेश अंबानी
author img

By

Published : Apr 28, 2021, 10:53 PM IST

अहमदाबाद - कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या गुजरातसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज धावून आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज जामनगरमध्ये 1 हजार बेडचे ऑक्सिजनची सुविधा असलेले रुग्णालय सुरू करणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जामनगरमध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले 1 हजार बेडचे रुग्णालय सुरू करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरून अंबानी यांनी अधिकाऱ्यांना 1 हजार बेडचे रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती गुजरात सरकारने दिली आहे.

हेही वाचा-लसीकरण नोंदणी सुरू होताच कोविनसह आरोग्य सेतू अॅपचे सर्व्हर डाऊन!

गुजरात सरकार पुरविणार मनुष्यबळ-

पुढील रविवारपर्यंत जामनगरमध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले 400 बेडचे रुग्णालय सुरू होईल, असे अंबानी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यानंतर या रुग्णालयातील बेडची क्षमता वाढवून आठवडाभरात 1 हजार करण्यात येणार आहे. गुजरात सरकारकडून रुग्णालयासाठी मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. रुग्णालयात लागणारी इतर साधने आणि उपकरणेही रिलायन्स इंडस्ट्रीजकडून बसविण्यात येणार आहेत. हे कोव्हिड रुग्णालय जामनगर आणि सौराष्ट्रातील जिल्ह्यांतील रुग्णांसाठी कार्यरत राहणार आहे.

हेही वाचा-रश्मी शुक्ला यांच्या चौकशीत अनेक बड्या नेत्यांची नाव येणार - आमदार अतुल भातखळकरांचा दावा

महाराष्ट्रालाही रिलायन्सकडून मदतीचा हात-

जामनगरध्ये असलेला रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. जामनगरमधून महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा मोफत पुरवठाही करण्यात आला आहे. गुजरातमधील जामनगर प्रकल्पामध्ये सुरुवातीला दररोज 100 टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली होती. मात्र, देशातील ऑक्सिजनची मागणी आणि कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता ऑक्सिजन निर्मितीचे प्रमाण हे 700 टन करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. हा ऑक्सिजनचा पुरवठा गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात करण्यात येत आहे. रोज 1 हजार टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीमधील सूत्राने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.