नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने 1991 नंतर प्रथमच राखीव सोन्याच्या साठ्याची विक्री केली आहे. विक्री केलेल्या सोन्याचे एकूण मूल्य हे १.१५ अब्ज डॉलर एवढे आहे. आरबीआयने चालू व्यवसाय वर्षात (जुलै-जून) ५.१ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले आहे. ही आकडेवारी आरबीआयच्या आकडेवारीमधून समोर आली आहे.
जालान समितीच्या शिफारसीनुसार आरबीआयला १.७६ लाख कोटी केंद्र सरकारला हस्तांतरित करावे लागणार आहेत. या दबावामधून आरबीआयने राखीव सोन्याच्या साठ्याची विक्री केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरबीआयला सोन्याच्या व्यापारामधून होणारा फायदा सरकारला देण्याची शिफारस जालान समितीने केली होती. आरबीआयच्या राखीव निधीचे पुनर्रचन करण्यासाठी जालान समिती नेमण्यात आली होती.
हेही वाचा-दिवाळीनिमित्त बाजारात आले वाजवण्याचे नव्हे खाण्याचे फटाके!
वित्तीय तूट वाढत असल्याने आरबीआयकडून राखीव निधी मिळावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. १९९१ मध्ये देशाकडील विदेशी गंगाजळीचा साठा काही आठवड्यापुरताच शिल्लक राहिला होता. त्यावेळी आरबीआयने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड आणि बँक ऑफ इंग्लंडमध्ये ६७ टन सोने गहाण ठेवले होते.