मुंबई - बँकांची बँक म्हणून काम करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने दोन बँकांना मोठा दंड केला आहे. आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेला १ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर लक्ष्मी विलास बँकेला ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने दोन्ही बँकांना दंड ठोठावल्याचे आज आदेश काढले आहेत. नियमांचे अनुपाल करण्यासंदर्भात आरबीआयने बँकांना दंड ठोठावला आहे. मात्र त्याचा दोन्ही बँकांच्या व्यवहारावर तसेच ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी विलास बँकेवर तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची कारवाई, 'ही' आहेत कारणे
दरम्यान, लक्ष्मी विलास बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची (पीसीए) कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढलेल्या बुडित कर्जासह (एनपीए) इतर कारणांमुळे लक्ष्मी विलास बँकेला वित्तीय शिस्त लागण्यासाठी ही कारवाई केली आहे.
बँकेवरील कारवाईची ही आहेत कारणे
- वाढलेले एनपीएचे प्रमाण
- जोखीम घेण्यासाठी कमी झालेले भांडवलचे प्रमाण (सीएआर)
- सलग दोन वर्षे मालमत्तेवर मिळणाऱ्या परताव्याचे घटलेले प्रमाण
- मालमत्तेसाठी घेण्यात आलेल्या कर्जाचे वाढलेले प्रमाण
हेही वाचा-बँक कर्जाचा वृद्धीदर प्रथमच घसरून एक अंकी; आरबीआयच्या आकडेवारीत ८.८ टक्क्यांची नोंद