मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयच्या नव्या निर्देशानुसार खातेदारांना १० हजार रुपयापर्यंतची रक्कम खात्यामधून काढता येणार आहे. यापूर्वी आरबीआयने १ हजाराची मर्यादा घालून दिली होती.
पीएमसी बँकेच्या स्थितीवर जवळून देखरेख करत असल्याचे आरबीआयने परिपत्रकात म्हटले आहे. आरबीआयने खातेदारांना सहा महिन्याच्या कालावधीत १० हजार रुपयापर्यंत पैसे काढण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे ६० टक्क्यांहून अधिक खातेदारांना सर्व रक्कम काढता येणार आहे.
हेही वाचा-काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध?
काय म्हटले आरबीआयने परिपत्रकात-
मुदतठेवी असणाऱ्या खातेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी आरबीआयने पीएमसीवर लादलेले नियम शिथील केले आहेत. या व्यतिरिक्त आरबीआयने पीएमसी बँकेवर लादलेल्या अटी आणि शर्तीत कोणताही बदल केला नाही. बँकेत मुदतठेवी ठेवणाऱ्यांचे हित लक्षात घेवून पुढील आवश्यक पावले उचलणार असल्याचे आरबीआयने परिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा-'केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम झाल्याने पीएमसीचे संकट'
आरबीआयने पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेच्या सर्व आर्थिक व्यवहारावर सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील पीएमसीच्या खातेदारांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले