मुंबई – डिजिटल व्यवहारात फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना, त्याला रोखण्यासाठी आरबीआयने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देयक व्यवस्था पुरविणाऱ्या कंपन्यांनी लोकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेची जागृती करण्यासाठी विविध भाषांमध्ये मोहीम सुरू करावी, असे आरबीआयने निर्देश दिले आहेत. त्यामधून ग्राहकांना डिजिटल देयक व्यवहाराची व फसवणुकीपासून वाचण्याची माहिती मिळावी, असे आरबीआयने निर्देशात नमूद केेले आहे.
आरबीआयने दिलेल्या निर्देशात म्हटले, की तुम्हाला तर माहितच आहे, की सुरक्षा आणि सुरक्षितता ही डिजिटल व्यवहारामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. त्याबाबत जागृती होण्यासाठी आरबीआय ई-बात कार्यक्रम आणि काही मोहिम आजवर घेत आलेली आहे. यामध्ये ओटीपी व पिन अशी महत्त्वाची माहिती सांगू नये आदींचा जनजागृतीमध्ये समावेश आहे.
डिजिटल सेवांमध्ये लोकांना फसवणूकीसाठी त्याच पद्धती सतत वापरण्यात येतात. त्याबाबत सर्व बँका आणि देयक व्यवस्थेत जागृती निर्माण करणयाची गरज आहे. त्यामुळे सर्व देयक व्यवस्थेतील कंपन्या आणि भागीदारांनी बहुभाषीय मोहिम, एसएमएस, वृत्तपत्र अथवा दृश्य माध्यमांतून सुरू करावी, असा आरबीआयने सल्ला दिला आहे. वायफायचा वापर करून आर्थिक व्यवहार करू नये, आदी आरबीआयने ग्राहकांना सूचना दिल्या आहेत.