नवी दिल्ली - प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरोधातील पहिला डोस घेतला आहे. यानंतर त्यांनी प्रत्येकाला कोरोना महामारीपासून संरक्षणासाठी लस मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
उद्योगपती रतन टाटा यांनी समाज माध्यमात लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. लशीचा पहिला डोस आज मिळाला आहे. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. ही लस मिळणे कष्टविरहित आणि वेदनाविरहित होते, असे टाटा यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण देशात वाढत असताना रतन टाटा यांनी लस घेतली आहे. टाटा म्हणाले, मला खरोखर आशा आहे. प्रत्येकाची लस मिळेल. त्यांचे संरक्षण होईल.
हेही वाचा-...तर विश्वासघातकी महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी
देशात कोरोनाचे पुन्हा वाढते प्रमाण-
शुक्रवारी देशात २३,२८५ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. हे एकाच दिवसात रुग्ण आढळल्याचे प्रमाण गेल्या ७८ दिवसांमध्ये सर्वाधिक आहेत. शुक्रवारपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचे प्रमाण हे १,१३,०८,८४६ इतके असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री
कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिम
देशातील लसीकरण मोहिमेतून २.८० कोटीहून अधिक जणांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिम सुरू आहे. या मोहिमेत कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. दुसऱया टप्प्यातील लसीकरण मोहिम ही १ मार्चपासून सुरू झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वय आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांहून वयाच्या नागरिकांना लस देण्यात येत आहे.