ETV Bharat / business

रतन टाटांची लॉजिस्टिक्स कंपनी मेलइटमध्ये गुंतवणूक - मेलइट कंपनी

मेलइट कंपनीकडून कुरियर, कार्गो, थ्रीपीएल, मेल रुम व्यवस्थापनचे डिजीटल सोल्यूशन्स आणि पोस्ट सेवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना देण्यात येतात. तसेच या सेवा टाटा ग्रुपच्या ब्ल्यू चिप कंपन्यांनाही देण्यात येतात.

Ratan Tata
रतन टाटा
author img

By

Published : Apr 21, 2021, 5:15 PM IST

नवी दिल्ली - उद्योगपती रतन टाटा यांनी मेलइट या तंत्रज्ञानावर आधारित लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. मेलरुम्स कंपनीने देशभरात ५०० मेलरुम्स लाँच करण्याचे नियोजन केले आहे. तर पाच वर्षात वेअरहाऊस आणि वितरण केंद्रेही सुरू करण्यात येणार आहे.

मेलइट कंपनीकडून कुरियर, कार्गो, थ्रीपीएल, मेल रुम व्यवस्थापनचे डिजीटल सोल्यूशन्स आणि पोस्ट सेवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना देण्यात येतात. तसेच या सेवा टाटा ग्रुपच्या ब्ल्यू चिप कंपन्यांनाही देण्यात येतात.

हेही वाचा-कोव्हॅक्सिन लस डबल म्युटंट स्ट्रेनवर प्रभावी-आयसीएमआरचे संशोधन

कंपनीकडून इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स अँड मेलरुम सोल्यूशन्स (आयएल अँड एमएस) प्लॅटफॉर्म करण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण वितरण साखळीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे दळणवळण आणि वितरणाच्या खर्चात कपात होण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे. टाटा ग्रुपने म्हटले, की मेलइट आयएल अँड एमएसमुळे पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच देशभरात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. मेलइट कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन महेश शिरोडकर म्हणाले की, टाटाच्या गुंतवणुकीने कंपनीचा अधिक विस्तार होऊ शकणार आहे.

हेही वाचा-भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक, गजा मारणे रॅली प्रकरण भोवले

विविध कंपन्यांमध्ये टाटाची गुंतवणूक-

टाटा ग्रुपचे मानद चेअरमन रतन टाटा यांनी १२हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये स्नॅपडील, कार्याह, डॉगस्पॉट, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन, कारदेखो, सबसे टेक्नॉलॉजीस, शाओमी आणि ओला या कंपन्यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.