नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस डब्यांची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही.के. यादव यांनी दिली.
चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) वंदे भारत एक्सप्रेस डब्यांची निर्मिती करणार नसल्याचे व्ही.के. यादव यांनी सांगितले. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसला 'ट्रेन १८' असे म्हटले जात होते. आयसीएफकडून २०२०-२१ व २०२१-२२ वर्षात ४० वंदे भारत एक्सप्रेसचे उत्पादन घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली व कटरादरम्यान सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा-'टास्क फोर्सने अहवाल दिल्यानंतर सरकार पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीला करणार सुरुवात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली ते त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीला सुरू केली होती. हे ८५० किलोमीटरचे अंतर वंदे भारत ८ तासात पूर्ण करते. तर इतर रेल्वेला १२ तास लागतात.
हेही वाचा-प्लास्टिक बॉटल नष्ट करून मोबाईल रिचार्ज करा; रेल्वे मंत्रालयाचा उपक्रम