नवी दिल्ली – देशात टाळेबंदीदरम्यान पब्जीचे डाऊनलोडचे प्रमाण वाढले आहे. देशात आजतागायत पब्जीचे 175 दशलक्ष डाऊनलोड झाले आहेत. या गेमने पब्जी मोबाईल गेमने चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 9 हजार 731 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
पब्जीने जगभरात आजतागायत एकूण 22 हजार 457 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे पब्जीचे जगात सर्वाधिक डाऊनलोड देशात आहेत. कोरोना महामारी आणि टाळेबंदी अनेकांना घरातच थांबावे लागत आहे. या परिस्थितीमुळे कंपनीने मार्चमध्ये 2 हजार 21 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ही आकडेवारी सेन्सर टॉवर या अनालिटिक्स कंपनीने दिली आहे.
- पब्जी ही पूर्णपणे चिनी कंपनी नाही.
- या गेमची निर्मिती आणि व्यवस्थापन हे दक्षिण कोरियाची कंपनी ब्ल्यूहोल कंपनीकडे आहे. चिनी कंपनी टेन्सेंटबरोबर ब्ल्यूहोलने भागीदारी केल्यानंतर पब्जीची लोकप्रियता वाढली आहे. त्यानंतर पब्जीच्या वितरणाचा मोठा हिस्सा ब्ल्यूहोलने टेन्सेंटकडे दिला आहे.
- भारतात पब्जीचे वितरण हे टेन्सेंट होल्डिंगकडेआहे. नुकतेच केंद्र सरकारने बंदी केलेल्या 59 अॅपमध्ये पब्जीचा समावेश केला नाही.
- गेम फॉर पीस हा पब्जीने काढलेला गेमही जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश मिळवित आहे.