नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात ढालीसारखे वापरण्यात येणाऱ्या एन-९५ मास्कच्या किमती ४७ टक्क्यांनी उतरल्या आहेत. राष्ट्रीय औषधी नियंत्रण प्राधिकरणाने (एनपीपीए) देशात एन-९५ मास्कच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचललली आहेत. त्याचा परिणाम मास्क उत्पादक आणि आयातदारांनी किमती कमी केल्या आहेत.
देशातील बाजारपेठेत एन-९५ मास्क हा सुमारे १५० ते ३०० रुपयांनी विकण्यात येत होता. एनपीपीएने मास्क उत्पादकांना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर किमती उतरल्या आहेत. यापूर्वी एनपीपीएने मुंबई उच्च न्यायालयातही एन-९५ च्या किमती नियंत्रणात आणण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा-कोटक महिंद्रा बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात
देशात एन-९५ मास्कचा पुरवठा सुरळित व्हावा, यासाठी सरकारकडून थेट उत्पादक, आयातदार आणि पुरवठादाराकडून खरेदी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने एन-९५ मास्कचा जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ प्रमाणे जीवनावश्यक वस्तूत समावेश केला आहे. त्यामुळे मास्कची साठेबाजी आणि जास्त दराने विक्री करणे हा गुन्हा आहे.
हेही वाचा-स्थावर मालमत्ता क्षेत्राला तत्काळ मदत करा- क्रेडाईची पंतप्रधानांकडे मागणी