नवी दिल्ली – 'आत्मनिर्भर भारत' आणि 'डिजीटल इंडिया'ला प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी संपर्कविरहित असलेले स्टेट बँक आणि आयआरसीटीसीचे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.
दरवर्षी 30 दशलक्ष लाख रेल्वेची तिकीटे आयआरसीटीसीमधून आरक्षित केली जातात. त्यापैकी 10 टक्के लोकांनी आयआरसीटीसीचे क्रेडीट कार्ड वापरावे, असे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
ही आहेत आयआरसीटीसी-स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्डची वैशिष्ट्ये
- आयआरसीटीसी-स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्ड हे मेक इन इंडियाअंतर्गत रेल्वेने लाँच केले आहे.
- ग्राहकांना सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्याकरता निअर फिल्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
- हे कार्ड घेण्यासाठी 500 रुपये शुल्क आहे. मात्र, 31 मार्च 2021 पर्यंत हे शुल्क माफ करण्यात आले आहे.
- कार्ड सुरू करताच 350 बोनस रिवार्ड पाँईट वापरकर्त्याला मिळतात.
- कोरोनानंतरच्या जगात हे कार्ड लोकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जेवण, सिनेमा अशा खरेदीसाठी कार्डचा वापर केल्यानंतर ग्राहकांना रिवार्ड दिले जाणार आहे.
- या रिवार्डचा वापर करून ग्राहकांना रेल्वेचे तिकीट खरेदी करता येणार आहे.
- वातानुकूलित आसनाच्या तिकीट आरक्षणासाठी कार्डचा वापर केल्यास 10 टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
- इंधन खरेदीवरील अतिरिक्त शुल्काला 1 टक्के माफी, ऑनलाईन मोफत पैसे हस्तांतरण, प्रिमियअम लंगमध्ये वर्षातून चारवेळा मोफत परवानगी आदी सुविधा कार्डवर देण्यात येणार आहेत.
- हे कार्ड हे रुपे क्रेडीट कार्ड आहे. या कार्डाद्वारे ऑनलाईन खरेदी केल्यानंतरही विविध सवलती दिल्या जाणार आहेत. ई-कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करताना ग्राहकांना सवलत दिली जाणार आहे.