नवी दिल्ली - केंद्र सरकारने औषधी विभागाचे सचिव पी. डी. वाघेला यांची दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) चेअरमनपदी निवड केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे.
सनदी अधिकारी पी. डी. वाघेला हे गुजरात केडरच्या १९८६ बॅचचे आहेत. त्यांची सध्याचे ट्रायचेअरमन राम सेवक शर्मा यांच्याजागी निवड होणार आहे. शर्मा हे २०१५पासून चेअरमनपदावर आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने पी. डी. वाघेला यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी अथवा त्यांच्या वयाच्या ६५ वर्षांच्या कार्यकाळापर्यंत असणार आहे.
हेही वाचा-साखर निर्यातीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ; साखर कारखान्यांना मोठा दिलासा
शर्मा यांना २०१८मध्ये तीन वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली होती. त्यांच्या कार्यकाळात ट्रायच्या धोरणात आमुलाग्र बदल झाले आहेत. नेट न्युट्रिलिटीचा भारतामध्ये स्वीकार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राम सेवक शर्मा यांनी ब्रॉडकास्टिंग आणि केबल सेवेसाठी नवा आकृतीबंध निश्चित केला आहे.
हेही वाचा-सणासुदीच्या मुहूर्तावर एसबीआय ग्राहकांना देणार किरकोळ कर्जावर ऑफर