ETV Bharat / business

कच्च्या तेलाचे दर वाढूनही पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेऊन सार्वजनिक तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करण्यात येतात. मात्र, सार्वजनिक कंपन्यांनी इंधनाचे दर आज वाढविले नाहीत.

पेट्रोल डिझेल किंमत न्यूज
पेट्रोल डिझेल किंमत न्यूज
author img

By

Published : Feb 3, 2021, 3:29 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलचे दर बुधवारी स्थिर राहिले आहेत. विशेष म्हणजे कच्च्या तेलाचे दर वाढूनही सलग सातव्या दिवशी इंधनाचे दर 'जैसे थे' स्थिर राहिले आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल ५८ डॉलरवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेऊन सार्वजनिक तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करण्यात येतात. मात्र, सार्वजनिक कंपन्यांनी इंधनाचे दर आज वाढविले नाहीत. दिल्लील पेट्रोल प्रति लिटर ८६.३० रुपये तर डिझेल प्रति लिटर ७६.४८ रुपये आहे.

हेही वाचा-अ‌ॅमेझॉनच्या सीईओ पदावरून जेफ बेझोस पायउतार होणार

  • देशभरात इंधनाचे दर आज 'जैसे थे' राहिले आहेत.
  • मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९२.८६ रुपये आहे. तर चेन्नईत प्रति लिटर ८८.८२, कोलकात्यात ८७.६९ रुपये असा पेट्रोलचा दर आहे.
  • डिझेलचा दर मुंबईत प्रति लिटर ८३.३० रुपये, चेन्नईत ८१.७१ रुपये आणि कोलकात्यात ८०.०८ रुपये आहे.

हेही वाचा-राज्यांच्या जीएसटी कर संकलनात वाढ होण्याची शक्यता

कच्च्या तेलाचे दर वाढण्याची ही आहेत कारणे-

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी भारतासाह काही देशांमध्ये लसीकरणाची मोहिम सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करणार असल्याचे जाहीर केल्यानेही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचे दर वाढले आहेत. जानेवारीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १० वेळा वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २.५९ रुपये तर डिझेलचे दर २.६१ रुपयांनी वाढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.