ETV Bharat / business

कोरोनावरील पंतजलीचे आयुर्वेदिक औषध चाचणीपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात - पतंजली आयुर्वेदिक औषधे न्यूज

देशाच्या औषधी नियंत्रकांनी (डीजीसीआय) कोरोना रुग्णावर उपचारासाठी पंतजलीच्या औषधाला कोणतीही परवानगी दिली नाही. तरीही इंदूरच्या जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी पतंजलीला परवानगी दिल्याने आश्चर्य वाटत असल्याचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिकात्मक- पंतजली
प्रतिकात्मक- पंतजली
author img

By

Published : May 28, 2020, 2:39 PM IST

इंदूर - बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टने कोराना रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांची चाचणी करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारकडे परवानगी मागितली आहे. याप्रकरणी इंदूरच्या जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यांनतर काँग्रेसने पतंजलीच्या औषधाला विरोध केला आहे.

देशाच्या औषधी नियंत्रकांनी (डीजीसीआय) कोरोना रुग्णावर उपचारासाठी पंतजलीच्या औषधाला कोणतीही परवानगी दिली नाही. तरीही इंदूरच्या जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी पतंजलीला परवानगी दिल्याने आश्चर्य वाटत असल्याचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोना महामारीचा तडाखा; बोईंगमधील १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

औषधी नियंत्रण महासंचालनालयाकडून कायदेशीर आचारसंहिता असते. त्यांच्या परवानगीनंतर मानवावर औषधांचे उपचार करण्यात येतात, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-महामारीने अनेकांपुढे जगण्याचे प्रश्नचिन्ह; १० पैकी एकाने गमाविली नोकरी

मात्र, जिल्हाधिकारी मनिष सिंह यांनी पतंजलीच्या प्रस्तावाला मंजूर केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. याप्रकरणी गोंधळ पसरविला जात असल्याचे मनिष सिंह यांनी म्हटले आहे. विषाणुची लागण झालेल्या रुग्णावर आयुर्वेदिक औषधाचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे बाबा रामदेव यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सांगितले आहे.

हेही वाचा-कोरोनाची चाचणी केवळ २०० रुपयात; सीएसआयआरचा रिलायन्सबरोबर करार

पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण म्हणाले, इंदूरमधील रुग्णावर आयुर्वेदिक उपचाराचा कोणताही प्रयोग करण्याची कंपनीची इच्छा नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. आम्ही महामारीच्या काळात उपचारासाठी दाखल केलेला प्रस्ताव हा पारंपारिक आयुर्वेदिक उपचारावर आधारित आहे. त्याचा यापूर्वी लाखो लोकांना उपयोग केला आहे. या उपचार पद्धती वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.