इस्लामाबाद - चीनकडून २१० कोटी डॉलरचे कर्ज मिळणार असल्याचे पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहे. चीन स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये २५ मार्चला पैसे जमा करणार आहे.
कर्ज मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाचे प्रवक्ते खक्वान नजीब खान यांनी पाकिस्तानच्या माध्यमाला सांगितले. चीनकडून मिळणाऱ्या कर्जामुळे विदेशी राखीव चलनाचा साठा वाढविणे आणि आर्थिक व्यवहारात संतुलन साधणे शक्य होणार असल्याचे खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नोव्हेंबर २०१८ ला चीनचा दौरा केला होता. बीजिंग भेटीदरम्यान चीनने पाकिस्तानला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठीच्या अटीबाबत चर्चा पूर्ण झाली नव्हती.
पाकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाकमधील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येत असल्याचे चीनचे वाणिज्य दूत लाँग डिंगबिन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते. तसेच कर्ज देण्याऐवजी विविध उद्योग पाकिस्तानमध्ये सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. चीन सरकारने पाकिस्तानला तांदूळ, साखर आणि लोकरीची बाजारपेठ खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. करारानुसार २ लाख टन तांदूळ आणि ३ लाख टन साखरेची निर्यात करण्याची चीनने पाकिस्तानला परवानगी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची चीनला होणारी निर्यात २२० कोटी डॉलरवर पोहोचेल अशी करारातून अपेक्षा करण्यात आली आहे.
पाकिस्तानला चीनकडून मिळणार २१० कोटी डॉलरचे कर्ज - पाकिस्तान अर्थव्यवस्था
पाकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाकमधील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येत असल्याचे चीनचे वाणिज्य दूत लाँग डिंगबिन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

इस्लामाबाद - चीनकडून २१० कोटी डॉलरचे कर्ज मिळणार असल्याचे पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहे. चीन स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये २५ मार्चला पैसे जमा करणार आहे.
कर्ज मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाचे प्रवक्ते खक्वान नजीब खान यांनी पाकिस्तानच्या माध्यमाला सांगितले. चीनकडून मिळणाऱ्या कर्जामुळे विदेशी राखीव चलनाचा साठा वाढविणे आणि आर्थिक व्यवहारात संतुलन साधणे शक्य होणार असल्याचे खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नोव्हेंबर २०१८ ला चीनचा दौरा केला होता. बीजिंग भेटीदरम्यान चीनने पाकिस्तानला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठीच्या अटीबाबत चर्चा पूर्ण झाली नव्हती.
पाकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाकमधील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येत असल्याचे चीनचे वाणिज्य दूत लाँग डिंगबिन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते. तसेच कर्ज देण्याऐवजी विविध उद्योग पाकिस्तानमध्ये सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. चीन सरकारने पाकिस्तानला तांदूळ, साखर आणि लोकरीची बाजारपेठ खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. करारानुसार २ लाख टन तांदूळ आणि ३ लाख टन साखरेची निर्यात करण्याची चीनने पाकिस्तानला परवानगी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची चीनला होणारी निर्यात २२० कोटी डॉलरवर पोहोचेल अशी करारातून अपेक्षा करण्यात आली आहे.
पाकिस्तानला चीनकडून मिळणार २१० कोटी डॉलरचे कर्ज
इस्लामाबाद - चीनकडून २१० कोटी डॉलरचे कर्ज मिळणार असल्याचे पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहे. चीन स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये २५ मार्चला पैसे जमा करणार आहे.
कर्ज मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाचे प्रवक्ते खक्वान नजीब खान यांनी पाकिस्तानच्या माध्यमाला सांगितले. चीनकडून मिळणाऱ्या कर्जामुळे विदेशी राखीव चलनाचा साठा वाढविणे आणि आर्थिक व्यवहारात संतुलन साधणे शक्य होणार असल्याचे खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नोव्हेंबर २०१८ ला चीनचा दौरा केला होता. बीजिंग भेटीदरम्यान चीनने पाकिस्तानला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठीच्या अटीबाबत चर्चा पूर्ण झाली नव्हती.
पाकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाकमधील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येत असल्याचे चीनचे वाणिज्य दूत लाँग डिंगबिन यांनी मुलाखती दरम्यान सांगितले होते. तसेच कर्ज देण्याऐवजी विविध उद्योग पाकिस्तानमध्ये सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
चीन सरकारने पाकिस्तानला तांदूळ, साखर आणि लोकरीची बाजारपेठ खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. करारानुसार २ लाख टन तांदूळ आणि ३ लाख टन साखरेची निर्यात करण्याची चीनने पाकिस्तानला परवानगी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची चीनला होणारी निर्यात २२० कोटी डॉलरवर पोहोचेल अशी करारातून अपेक्षा करण्यात आली आहे.
Conclusion: