ETV Bharat / business

कांदे स्वस्ताईकडे, प्रति क्विटंल तीन ते साडेतीन हजार रुपयांची घसरण - लासलगाव कांदा बाजारपेठ

एकीकडे कांद्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे भाव घसरल्याने  कांदा  उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अजूनही पुढे अशीच परिस्थिती राहिली,  तर अजून दर कमी होतील, असे व्यापारी सांगत आहेत.

Bid of onions
कांद्याचा लिलाव
author img

By

Published : Dec 9, 2019, 7:01 PM IST

नाशिक - कांद्याच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या भावात आज अखेर घसरण झाली आहे. देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावांसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत.

कांदे स्वस्ताईकडे

एकीकडे कांद्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिली, तर अजून दर कमी होतील, असे व्यापारी सांगत आहेत. सरकारने कांदा साठवणूक करण्याला बंधन घातल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कांदे खरेदी करणे शक्य नाही. अशा स्थितीत येत्या काही दिवसात बाजारपेठेत कांद्याची आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला

सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार आहे. यामुळे शेतकरीवर्गात नाराजीचा सूर पसरला आहे. केंद्र सरकारने कांदे साठवणुकीसह निर्यातीवर लावलेले बंधने त्वरित काढावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा-आयात केलेला कांदा जानेवारीमध्ये देशात पोहोचणे अपेक्षित

Intro:गेल्या काही महिन्या पासून वाढलेल्या कांद्याच्या भावाला आज ब्रेक लागला असून लासलगाव,मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्या मध्ये प्रती क्विंटल 3 ते साडे तीन हजार रुपयांनी कांद्याचे दर कोसळले.कांद्याच्या भावात घसरण झाली असल्याचे पाहून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर कांदा उत्पादक शेतकऱ्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.Body:लासलगाव,मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याचे भाव कोसळल्याने भावात मोठी घसरण झाली सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्या मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अजूनही पुढे अशीच परिस्थिती राहिली तर भाव अजून कमी होतील असे व्यापारी सांगत आहेत तर शासनाने कांदा साठवणूक करण्याला मर्यादा लावल्याने व्यापारी जास्त माल विकत घेऊ शकत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांवर बंधन आली आहेत.यामुळे अजून काही दिवसात आवक वाढून आणखी भाव कमी होण्याची शक्यता आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा होणार आहे.यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पसरला असुन शासनाने लावलेले बंधन त्वरित काढावे अशी मागणी शेतकरी करत आहेConclusion:लासलगाव मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजारसमित्या मध्ये आज कांद्याचे भाव जवळपास 3 ते 4 हजार रुपयांनी घसरले आहे अशीच परिस्थिती राहिली तर अजूनही भाव कमी होतील यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असुन भाव कमी झाल्याने मात्र सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
बाईट
कांदा व्यापारी बंटी चोपडा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.