ETV Bharat / business

क्रुड तेलाच्या दरात वाढ.. इराणकडून उत्पादनात होणार मोठी कपात

टाळेबंदीचे नियम शिथील केल्याने आणि टाळेबंदी उठवल्याने उर्जेची बाजारपेठ सावरेल, असा अंदाज सौदी अरेम्को कंपनीचे अध्यक्ष व सीईओ अमिन. एच. नासीर यांनी व्यक्त केला आहे. तसेच खनिज तेलाच्या बाजारपेठेत सकारात्मक वातवरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

author img

By

Published : Aug 10, 2020, 4:59 PM IST

संग्रहित -खनिज तेलाचे उत्पादन
संग्रहित -खनिज तेलाचे उत्पादन

नवी दिल्ली – देशात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. इराककडून खनिज तेलाचा पुरवठा कमी होणार असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चिंता व्यक्त आहे. त्या पार्श्वभूमीवर खनिज तेलाचे दर आज वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात इराकने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रति दिन 4 लाख बॅरलचे खनिज तेलाचे उत्पादन कमी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. कारण, गेल्या तीन महिन्यांत इराकने खनिज तेलाचे अतिरिक्त उत्पादन घेतले होते. खनिज तेलाचे उत्पादन कमी करून इराककडून ओपेक संघटनेच्या नियमाचे पालन कराणार आहे.

आंतरखंडीय शेअर बाजारात (आयसीई) खनिज तेलाचा दर ऑक्टोबरमधील सौद्यासाठी 1.06 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरलसाठी 44.87 डॉलर झाला आहे. अमेरिकेचे सरकार अर्थव्यवस्था चालना देण्यासाठी पॅकेज जाहीर करेल, अशी बाजाराची अपेक्षा आहे. त्यानंतर खनिज तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीचे नियम शिथील केल्याने आणि टाळेबंदी काढल्याने उर्जेची बाजारपेठ सावरेल, असा अंदाज सौदी अॅरेम्को कंपनीचे अध्यक्ष व सीईओ अमिन. एच. नासीर यांनी व्यक्त केला आहे. तसेच खनिज तेलाच्या बाजारपेठेत सकारात्मक वातवरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना महामारी व टाळेबंदीमुळे जगभरात खनिज तेलाची मागणी कमी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.