ETV Bharat / business

आक्षेपार्ह ट्विट केले तर स्वयंचलितपणे अकाउंट होऊ शकते बंद - Automatically blocking accounts on twitter

ट्विटरकडून वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच उपाययोजना करण्यात येतात. सतत आक्षेपार्ह ट्विट करणारे अकाउंट स्वयंचलितपणे डिलिट करण्यासाठी ट्विटर टूल आणणार आहे. आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या अकाउंटचा वापर करण्यासाठी सात दिवसापर्यंत मर्यादा घालून देण्यात येणार आहे.

Twitter Account news
ट्विटर अकाउंट
author img

By

Published : Feb 26, 2021, 6:23 PM IST

मुंबई - ट्विटरवर अनेकदा वापरकर्त्यांमध्ये विविध विषयांवरून वाद-प्रतिवाद सुरू असतात. त्यावरून होणाऱ्या आक्षेपार्ह ट्विटबाबत ट्विटरने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आक्षेपार्ह अकाउंट स्वयंचलितपणे बंद करणे व त्यांना म्यूट करण्यासाठी नवीन टूल आणण्याचे कंपनी नियोजन करत आहे.

ट्विटरकडून वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच उपाययोजना करण्यात येतात. सतत आक्षेपार्ह ट्विट करणारे अकाउंट स्वयंचलितपणे डिलिट करण्यासाठी ट्विटर टूल आणणार आहे. आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या अकाउंटचा वापर करण्यासाठी सात दिवसापर्यंत मर्यादा घालून देण्यात येणार आहे.

'व्हर्च्युअल अ‌ॅनलिस्ट डे' या निमित्ताने कंपनीने स्लाईद्वारे सादरीकरण केले. यामध्ये नवीन सुरक्षेच्या टूलबाबत माहिती देण्यात आली आहे. जर ट्विटरवरील नियम तोडले तर अकाउंट हे ब्लॉक होमार आहेत. द्वेषमूलक टिप्पणी, अपमानजनक भाषा वापरणारे अकाउंट म्यूट केले जाणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

हेही वाचा-कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी किमती वाढविल्याने पेट्रोल-डिझेल महाग

सध्या, भारतामधील अनेक वापरकर्त्यांना आक्षेपार्ह किंवा छळ करण्याच्या दृष्टीने चालविणाऱ्या अकाउंटबाबत माहिती नाही. अशा वापरकर्त्यांना चुकीच्या अकाउंटवर कारवाई करण्यासाठी विनंती करण्याचा पर्याय देण्यात येत आहे. सध्या, वापरकर्त्याला ट्विटबाबत थेट रिपोर्ट करता येणे शक्य आहे. त्यामध्ये नवीन टूलची भर पडणार आहे. वापरकर्त्याला बनावट अकाउंटही रिपोर्ट करता येणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

हेही वाचा-ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भांडवलीकरण करण्याची गरज-शक्तिकांत दास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.