नवी दिल्ली- टाळेबंदीत शिथिलता येत असतानाच महागाई वाढणार आहे. कारण, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी विनाअनुदानित गॅसच्या किमती आणि विमान इंधनाचे दर आजपासून वाढवले आहेत.
विनाअनुदानित 14.20 किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 11.50 रुपयाने वाढून 593 रुपये होणार आहे.
असे आहेत नवे वाढलेले दर
- कोलकाता - 616 रुपये
- मुंबई- 590.50
- चेन्नई-606.50
चेन्नईत सर्वाधिक 370 रूपयांनी गॅस सिलिंडर महागले आहेत.
सध्या, सरकारकडून 14.2 किलोचे 12 अनुदानित सिलिंडर देण्यात येतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यानंतर दिल्लीत सिलेंडरचा दर 744 रुपयावरून 581.50 रुपये मे महिन्यात करण्यात आला होता, असे इंडियन ऑईलने म्हटले आहे.
असे असले तरी प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना या दरवाढीची झळ काही लागणार नाही. या लाभार्थ्यांना 30 जूनपर्यंत मोफत गॅस सिलेंडर भेटणार आहेत.
विमान इंधनाचे दर प्रति किलो लिटर 11,030.62 रुपयावरून 33,575.37 करण्यात आले आहेत. दरम्यान, देशांतर्गत विमान वाहतूक सेवेला 25 मेपासून सुरुवात करण्यात आली आहे.
टाळेबंदीमुळे सरकारला मोठ्या महसुली उत्पन्नाला मुकावे लागले आहे.