ETV Bharat / business

विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात

रविवारपासून नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ५३ रुपयांनी कमी झाली आहे.

Non Subsidised LPG
गॅस सिलिंडर
author img

By

Published : Mar 2, 2020, 12:48 PM IST

नवी दिल्ली - विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत महानगरांमध्ये ५० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हे दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत सहावेळा विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. ऑगस्टनंतर प्रथमच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

ग्राहकांना दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरसाठी (१४.२ किलो) ८०५.५ रुपये द्यावे लागणार आहेत. रविवारपासून नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ५३ रुपयांनी कमी झाली आहे. यापूर्वी ग्राहकांना विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ८५८ रुपये द्यावे लागत होते. कोलकात्यामध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ८३९ रुपये, मुंबईमध्ये ७७६.५ रुपये आणि चेन्नईमध्ये ८२६ रुपये द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या महिन्यांतील आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे लागू करण्यात आले आहेत. ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यान विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्या होत्या.

हेही वाचा-आठवडभरात रुपयाची डॉलरच्या तुलनेत ५६ पैशांनी घसरण

दरम्यान, कोरोना विषाणुचा जगभरात प्रसार वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेब्रुवारीमध्ये गॅस सिलिंडरचे दर कमी होतील, असे म्हटले होते.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५०० अंशांनी उसळी; आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.