नवी दिल्ली - अमेरिका-इराणमधील तणावाची स्थिती निवळली आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, पेट्रोल व डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून ग्राहकांना दिलासा मिळाला नाही.
कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल प्रति लिटर १५ पैशांनी महागले आहे. तर डिझेल दिल्ली आणि कोलकातामध्ये ११ पैशांनी महागले आहे. तर मुंबई आणि चेन्नईत डिझेच्या किमती प्रति लिटर १२ पैशांनी वाढल्या आहेत. तर देशातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढल्या आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता
असे आहेत पेट्रोल-डिझेलचे दर-
इंडियन ऑईल वेबसाईटच्या आकडेवारीप्रमाणे दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.९६ रुपये, कोलकात्यात ७८.५४ रुपये, मुंबईत ८१.५५ रुपये आणि चेन्नईत ७८.९२ रुपये आहे. तर दिल्लीत डिझेल प्रति लिटर ६९.०५, कोलकात्यात ७१.४२ रुपये, मुंबईत ७२.४१ रुपये आणि चेन्नईत ७२.९७ रुपये आहे.
हेही वाचा-'या' बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी ९ महिन्यात सोडल्या नोकऱ्या