ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर क्रेडिट कार्डद्वारे मिळणारी सवलत १ ऑक्टोबरपासून बंद - digital modes of payments

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना ०.७५ टक्के क्रेडिट कार्डच्या वापरावर सवलत देण्याची सूचना केली होती. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांकडून गेली अडीच वर्षे डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास सवलत देण्यात येत होती.

संग्रहित - पेट्रोल पंप
author img

By

Published : Sep 25, 2019, 6:40 PM IST

नवी दिल्ली -तुम्ही जर पेट्रोल-डिझेलच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास सवलत देण्यात येते. ही सवलत १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला आहे.

केंद्र सरकारने अडीच वर्षापूर्वी क्रेडिट कार्डचा वापर करून इंधन खरेदी करणाऱ्यांना सवलत जाहीर केली होती. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारने ही सवलत जाहीर केली होती.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने क्रेडिट कार्डधारकांना सवलत बंद केल्याचे एसएमएसद्वारे कळविले आहे. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना ०.७५ टक्के क्रेडिट कार्डच्या वापरावर सवलत देण्याची सूचना केली होती. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांकडून गेली अडीच वर्षे डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास सवलत देण्यात येत होती. कार्डच्या वापरासाठी लागणारे शुल्क (एमडीआर) हे सरकारी तेल कंपन्यांनीच देण्याचे आदेशही सरकारने दिले होते. साधारणत: हे शुल्क विक्रेत्याकडून बँकांना दिले जाते.

क्रेडिट कार्डवरील सवलत बंद झाली तरी डेबिट कार्ड अथवा इतर डिजिटलद्वारे देण्यात येणारी सवलत सुरुच राहणार आहे. पेट्रोल-डिझेलचे देयकाच्या डिजिटल व्यवहारात २०१६ मध्ये १० टक्के तर २०१८ मध्ये २५ टक्के वाढ झाली. सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ०.७५ टक्क्यांची सवलत ०.२५ टक्के केली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.