ETV Bharat / business

सॅनिटायझरची खरेदी करण्याकरता 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार १ हजार रुपये

एनएमडीसी ही कर्मचारी, मजूर व प्रशिक्षणार्थी अशा सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहे. ही रक्कम वेतनाबरोबर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

सॅनिटायझर
सॅनिटायझर
author img

By

Published : Mar 21, 2020, 7:56 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढत असताना अनेकजण सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहेत. हा खर्च करत काळजी घ्यावी, यासाठी सरकारी कंपनी एनएमडीसी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजार रुपये देणार आहे.

एनएमडीसीचे चेअरमन एन. बैजेंद्र कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची ट्विटरवरून माहिती दिली. एनएमडीसी कर्मचारी, मजूर, प्रशिक्षणार्थी अशा सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहे. ही रक्कम वेतनाबरोबर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-तुमच्या हातामधील नोटांनीही पसरू शकतो कोरोना, एसबीआयने सूचविला 'हा' पर्याय

एनएमडीसी कंपनीमध्ये सुमारे ५ हजार ५०० कर्मचारी सेवेत आहेत. तर इतर २ हजार ५०० कर्मचारी हे कंत्राटी आहेत. कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना केल्याचे एन. बैजेंद्र कुमार यांनी सांगितले. तसेच कंपनीची कार्यालये आणि इमारती सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-मुंबई-दिल्लीतून रेल्वे प्रवास केलेले १२ प्रवासी सापडले कोरोना 'पॉझिटीव्ह'

एनएमडीसी हे स्टील मंत्रालयांतर्गत येणारी देशातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.