ETV Bharat / business

एमएमएमई क्षेत्राला वेळेवर देयके मिळण्याकरिता ठोस निर्णय घेवू, नितीन गडकरींचे आश्वासन - मराठी बिझनेस न्यूज

येत्या पाच वर्षात नवी दिल्ली प्रदूषणमुक्त करू, असे आश्वासन नितीन गडकरींनी दिले.  पुढे ते म्हणाले,  लहान उद्योगांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपते. त्यावर गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.

कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी
author img

By

Published : Aug 18, 2019, 5:09 PM IST

नागपूर - देयके मिळत नसणे ही सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची मुख्य डोकेदुखी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्यावर मार्ग काढण्यासाठी ठोस निर्णय घेवू, असे त्यांनी आश्वासन दिले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या लघू उद्योग भारतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

येत्या पाच वर्षात नवी दिल्ली प्रदूषणमुक्त करू, असे आश्वासन नितीन गडकरींनी दिले. पुढे ते म्हणाले, लहान उद्योगांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपते. त्यावर गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. खासगी क्षेत्र असो अथवा सरकार एमएमएमई क्षेत्राची देयके ४५ दिवसात द्यायला पाहिजेत.

एमएमएमई हा रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही गडकरी म्हणाले. एमएसएमई क्षेत्रामधून ११.५० लाख तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. येत्या पाच वर्षात आणखी ५ कोटी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे ध्येय निश्चित केल्याचे गडकरींनी सांगितले.

एमएमएमई मंत्रालयाकडून हातमाग, हस्तकला आणि कृषी प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित केले जात असल्याची त्यांनी माहिती दिली. आंत्रेप्रेन्युअरशिपला प्रोत्साहन देणे ही सरकारची महत्त्वाची मोहिम आहे. त्याशिवाय ५ लाख कोटी डॉलरची देशाची अर्थव्यवस्था होणे शक्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.