लंडन - पंजाब नॅशनल बँकेची सुमारे २ अब्ज डॉलरची फसवणूक करणारा नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात कैद आहे. मोदी आज वेस्टमिनिस्टर न्यायालयासमोर व्हिडिओ लिंकने उपस्थित राहणार आहे.
नीरव मोदी आज न्यायालयासमोर न्यायालयीन प्रक्रियेचा नियमित भाग म्हणून उपस्थित राहणार आहे. ४८ वर्षीय मोदीचे इंग्लंडकडून प्रत्यार्पण होण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. न्यायालयाकडून मोदीवर खटला चालविण्यासाठी पुढील वर्षी मे महिन्यात तारीख दिली जाण्याची शक्यता आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने काहीही प्रगती झाली नसल्याची टिप्पण्णी केली होती.
हेही वाचा-पीएनबीपेक्षाही मोठा घोटाळा; नीरव मोदीनंतर आता संदेसारा ब्रदर्सनी भारतीय बँकांना लावला चुना
मोदीला लंडनमध्ये असलेल्या दक्षिण-पूर्वेकडील वँड्सवर्थच्या तुरुगांत ठेवण्यात आले आहे.लंडनमध्ये सर्वात अधिक कैदी याच तुरुंगात ठेवण्यात आले आहेत. मोदीला स्कॉटलँड यार्डच्या अधिकाऱ्यांनी १९ मार्चला अटक केली आहे. तेव्हापासून तो तुरुंगात कैद आहे.
हेही वाचा-नीरव मोदीला दणका; ७३०० कोटी रुपये व्याजासह पीएनबी बँकेला परत करण्याचे आदेश