ETV Bharat / business

संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी चालू वर्षात ९० हजार ४८ कोटींची तरतूद - Monsoon session of parliament

कोरोनाच्या संकटातही चीन, पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी निधीत आणखी वाढ केली आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Sep 15, 2020, 1:25 PM IST

नवी दिल्ली - संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने संरक्षण सेवेअंतर्गत २०२०-२१साठी ९० हजार ४८ कोटी रुपयांचा तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद वाढविण्यात आली आहे.

राज्यसभेचे खासदार पी. भट्टाचार्य व विजयपाल सिंह तोमर यांनी विचारलेल्या प्रश्नाला श्रीपाद नाईक यांनी लेखी उत्तर दिले आहे. संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणात नवी शस्त्रास्त्रांची खरेदी आणि सध्या असलेल्या शस्त्रास्त्रांचे आणि यंत्रणेच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे. यासाठी एकूण तरतुदीच्या २७.८७ टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

हेही वाचा-दिलासादायक वृत्त.. 'ही' कंपनी देणार ३० हजार हंगामी नोकऱ्या

संरक्षण दलाला मिळणाऱ्या भांडवलाच्या उपलब्धतेप्रमाणे आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे नाईक यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत दोन्ही सभागृहांचे काम रोज चार तास चालत आहे.

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेतील महागाईत ऑगस्टमध्ये अंशत: घसरण

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सीमारेषेनजीक भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संरक्षण दलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.