नवी दिल्ली – दोन महिने सुरू असलेल्या टाळेबंदीचा दिल्लीमधील अत्तर व पर्फ्युअम विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. सोशल डिसटन्सिंगच्या नियमामुळे ग्राहक खरेदी करताना पर्फ्युअमच्या खरेदीत निरुत्साह दाखवित आहेत.
दिल्लीच्या कॅनॉट येथे अत्तर व सुगंधी द्रव्याची ( पर्फ्युअम) मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांचे ब्रँड विक्रीला ठेवण्यात येतात. ग्राहकांचीही नेहमीच गर्दी दिसून येते. येथील सीपी जनपथ परिसरात वासू हँडिक्राफ्ड हे 100 हून अधिक पर्फ्युअमसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
दिल्लीमधील पर्फ्युअमची दुकाने हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत दुकानदार असल्याचे दिसत आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना दुकानदार भारत भुषण म्हणाले, की आम्ही 1 जूनपासून दुकान सुरू केले आहे. अनेक ग्राहक दुकानांमध्ये गर्दी करत होते. मात्र, ग्राहक मिळविण्यात अडचणी येत आहेत. आम्ही अस्सल पर्फ्युअम विकतो, असेही दुकानदाराने सांगितले.
जनपथ बाजारात विदेशातील नागरिकांचा ओढा दिसत होता. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासांवर बंधने आल्याने विदेशी नागरिक येत नाही. सर्व कच्चा माल हा उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतामधून येतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. येत्या तीन महिन्यातही पर्फ्युअम उद्योगावर परिणाम होणार असल्याचे स्थानिक विक्रेत्याने सांगितले. सरकारने आर्थिक मदत करावी, अशी दुकानदाराने अपेक्षा व्यक्त केली.