ETV Bharat / business

नेटफ्लिक्सच्या सशुल्क सदस्यांनी ओलांडला २०० दशलक्षचा टप्पा - Netflix members in 2020

नेटफ्लिक्सने चौथ्या तिमाहीमधील कामगिरीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार सशुल्क सदस्यांची संख्या ८.५ दशलक्षने वाढली आहे.

नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्स
author img

By

Published : Jan 20, 2021, 6:45 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - नेटफ्लिक्सच्या सशुल्क सदस्यांची संख्या २०० दशलक्षहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या काळात स्ट्रिमिंग आणि मनोरजंनाची मागणी वाढल्याने नेटफ्लिक्सच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नेटफ्लिक्सने चौथ्या तिमाहीमधील कामगिरीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार सशुल्क सदस्यांची संख्या ८.५ दशलक्षने वाढली आहे. तर सशुल्क स्ट्रीमिंग सदस्यांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. तर सरासरी प्रेक्षकांची संख्या तेवढीच राहिली आहे. २०१८ पासून सदस्यांची संख्या १११ दशलक्षांवरून २०४ दशलक्ष झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात दरवर्षी ४ ते ५ अब्ज डॉलरने महसुलात वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सला चौथ्या तिमाहीत ६.६४ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळाले आहे.

हेही वाचा-जागतिक बाजारात सकारात्मक चित्र; शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गाठला नवा उच्चांक

नेटफ्लिक्सच्या सशुल्क सदस्यांच्या संख्येत ३७ दशलक्षने वाढ -

अंदाजाप्रमाणे यंदा कंपनीच्या महसुलात १ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात नेटफ्लिक्सच्या सशुल्क सदस्यांच्या संख्येत ३७ दशलक्षने वाढ झाली आहे. या सदस्यांच्या संख्यावाढीनंतर कंपनीला वार्षिक २५ अब्ज डॉलर वार्षिक महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले. दरम्यान, भारतामधील मनोरजंनाच्या चाहत्यांसाठी नेटफ्लिक्सने ५ ते ६ डिसेंबरला स्ट्रीमफेस्ट या मोफत स्ट्रिमिंगचे आयोजन केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.